आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्यायाम करत असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले तरच व्यायामाचा योग्य तो फायदा होऊ शकतो. व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर अशा लोकांनी योग्य आहार घेतल्यास शरीराची झिज भरून निघते. तसेच मांसपेशी मजबूत होतात. व्यायाम करण्यापूर्वी पोषक द्रव्ये असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे ऊर्जा मिळते, आणि आरोग्य चांगले राहते.
हे पदार्थ खावेत
अंडी
भूक चांगली असल्यास प्रोटिनासाठी अंडी खा. यामुळे पोट भरलेले राहते आणि व्यायामासाठी ऊर्जा मिळते.
लो फॅट चीज
चीजमधील प्रोटीन पचण्यास वेळ लागतो, तसेच शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळते. हे हृदय व हाडांसाठी फायदेशीर आहे.
केळी
यातील पोटॅशियम स्नायूंच्या क्रियेसाठी आवश्यक आहे. शरीराला व्यायाम करण्यासाठी आवश्यक असलेले कार्बोहाइड्रेट मिळतात.
ओटमिल
यामुळे शरीराला प्रोटीन मिळाल्याने व्यायामादरम्यान स्नायूंना ते उपयोगी ठरते.