अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात
पोलीसनामा ऑनलाइन टीम : महाराष्ट्रातील अनेक भागात अळूची भाजी आवर्जून खाल्ली जाते. कोकणात तर आळूची भाजी प्रसिद्ध आहे. अळूचे फदफदे, आळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या कंदाची भाजी असे विविध प्रकार बनवून आळू खाल्ली जाते. अळूची भाजी बारमाही उपलब्ध असते. अलिकडे तर अनेक स्वीटमार्ट आणि हॉटेलांमध्ये आळूची वडी उपलब्ध असते. अनेकजण मोठ्या आवडीने आळूची वडी खातात. अळू ही एक औषधी वनस्पती असून तिचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अळूच्या भाजीचे सेवन नियमित केल्यास वजनदेखील नियंत्रणात राहते.
अळूमध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. १ कप उकडलेल्या अळूच्या कंदामध्ये ९ ग्रॅम फायबर असते. फायबरमुळे विष्ठा मुलायम होते आणि आतड्यांना चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्यासही मदत करते. लठ्ठपणा असणारांनी अळूची भाजी आवर्जून खावी. अळूमध्ये डायटड्ढी फायबर असते, जे फॅट बर्न करण्यास शरीराची मदत करते. त्यामुळे अळू वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वजन वाढल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो, त्यामुळे वजन कमी करणे गरजेचे असते. आय़ुर्वेदातही आळूला खूप महत्व आहे. अळूचे कंदही लोक भाजी म्हणून खातात. तसेच पानेही स्वादिष्ट आणि पोष्टीक असतात. वेगवेगळ्या आजारांवरही अळूची पाने औषधी म्हणून वापरली जातात. अळूची भाजी आठवड्यातून २ ते ३ वेळा खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. कारण यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. १ कप अळूमध्ये (साधारण १३० ग्रॅम) केवळ १८७ कॅलरी असतात. तसेच यात ६.७ ग्रॅम फायबर, मॅग्नीज, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.
अळूची भाजी खाल्ल्याने हाय कोलेस्टड्ढॉलची समस्या होणार नाही, कारण अळूने शरीरातील बॅड कोलेस्टड्ढॉल कमी केले जातात. जर तुम्हाला हाय कोलेस्टड्ढॉलची समस्या असेल तर आठवड्यातून ३ ते ४ वेळा अळूची भाजी खावी. कोलेस्टड्ढॉलचे प्रमाण वाढल्यावर हृदयरोगांचा धोका वाढतो. त्यामुळे अळूची भाजी खाऊन हृदयरोगांनाही दूर ठेवू शकता. अळूची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते. कारण अळूमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. केवळ एक कप उकडलेल्या अळूमध्ये ३२० मिलीग्रॅम पोटॅशिअम असते. ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पोटॅशिअमयुक्त आहार घेतल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.