आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण नियमित खातो ती केळी पिवळ्या रंगाची असतात. या केळ्यांमध्ये सुद्धा पोषक घटक असल्याने ती खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. परंतु, लाल रंगाच्या केळी सुद्धा चविष्ठ आणि जास्त पौष्टिक असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या केळ्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
किडनी
यात पोटॅशियम भरपूर असल्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते. किडनी स्टोन, हृदयविकार व कर्करोग दूर राहतो. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
धुम्रपान
धुम्रपान सोडताना शरीरावर त्याचे परिणाम होतात, परंतु अशावेळी लाल केळी सेवन केल्यास यातील विटॅमिन सी, बी-६, पोटॅशियम व मॅग्नेशियममुळे शरीरावर होणारे परिणाम कमी होतात.
फायबर
यातील फायबरमुळे पचनसंस्था चांगली राहते. गॅसेस, अपचन व जुलाब यावर हे उपयुक्त ठरते.