आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळा आणि पावसाळ्यात वातावरणात बदल होत असतो. अशा वातावरणात योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहू शकते. वातावरणानुसार कपडे, आहार, व्यायाम यामध्ये बदल करणे गरजेचे असते. हिवाळ्यात स्वेटर, गरम कपडे, शॉल आदीचा वापर केला जातो. यामुळे शरीराच्या बाह्य भागाचे संरक्षण होते. परंतु, शरीराला आतून ऊर्जा मिळण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. थंड हवामानात कोणता आहार घ्यावा, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
हे आवश्य खा
शेंगदाणे
थंडीत शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीर गरम राहते. प्रोटिन्स सुद्धा मिळतात. फुफ्फुसाला बळ मिळते.
सुकामेवा
सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आतून ऊर्जा मिळते. शरीराचे तापमान संतुलित राहते. सुकामेव्याचे मिश्रण दिवसातून काही तासांच्या फरकाने खावे.
कॉफी
कॉफीतील फ्लेवनॉइडमुळे शरीराला गरमी मिळते. ह्रदयाचे कार्य चांगले चालते. सर्दीचा त्रास होत नाही.
पेरु
पेरुचे सेवन केल्यास थंडीत ह्रदयाची शक्ती वाढते. निरनिराळ्या व्हायरसपासून संरक्षण मिळते.
सफरचंद
सफरचंदातील अॅन्टी-ऑक्सिडेंट आणि प्रोटिन्समुळे शरीराला मजबूती मिळते.
गाजर
यातील व्हिटॅमीन ए, बी, सी, डी, ई आणि के मुळे थंडीशी लढण्यासाठी ऊर्जा मिळते.
संत्री
हे थंडीशी लढण्यसाठी ऊर्जा देते.
पालक
यातील लोह आणि पौष्टिक घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.