आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नाश्त्यामध्ये दररोज दूध आणि पोहे खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच नाश्त्यामध्ये ब्राऊन ब्रेड, कॉर्न फ्लेक्स, कडधान्ये, अंडी, फळे असणेही खूप आवश्यक आहे. दररोज एकसारखे अन्न घेऊ नये. त्यामुळे शरीराला सर्व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. रोज एकाच वेळी जेवण केले पाहिजे आणि झोपले पाहिजे. दिवसाला दोन हजाराहून अधिक कॅलरी धोकादायक ठरू शकतात. रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम, वॉक, जॉगिंग, योग आवश्य करावा.
रोज सॅलड, फळे आणि दही आवर्जून खाल्ले पाहिजे. दही बाजारातून आणण्यापेक्षा घरी लोणी काढून दही तयार करावे. त्यामुळे कॉलस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. तसेच चहामधील अँटी ऑक्सिजन शरीरासाठी फायदेशीर असतात; पण दूध आणि साखर नसणारा चहा घ्यावा. ग्रीन टी किंवा हर्बल टीमुळेही शरीराला फायदा होऊ शकतो. दिवसातून ३० ते ३५ कप ग्रीन टी किंवा हर्बल टी पिऊ शकता. कॉफी दोनपेक्षा अधिक वेळा घेऊ नये. रात्रीच्या वेळी घेऊच नका.
जेवणात डाळ, दोन ते तीन पोळ्या, ऋतूनुसार भाजी, दही, भात, सॅलड व पापड असावे. उच्च कॅलरीचे पदार्थ टाळावेत. त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. दिवसातून एकदा जेवणात दही घ्यावे. एक ग्लास दूध व पालेभाज्यांना जेवणामध्ये प्राधान्य द्यावे. नाश्ताही गरजेचा असतो. अंड्याच्या पांढऱ्या बलकात अधिक प्रोटीन असते. पण त्यासाठी मांसाहार गरजेचा नाही. मशरूम, दूध, पनीरमधूनही ते मिळू शकते. जर रोज तीन चमचे किंवा त्यापेक्षा अधिक तूप किंवा लोणी खाल्ल्यास चार आठवड्यांत कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले आढळते. रोज एक चमचा तूप खाल्ले तर समस्या कमी होईल.
१२५ ग्रॅम मैद्यामध्ये ४५५ कॅलरी असतात. तो पोटात जाऊन चिटकतो. पिझ्झा, ब्रेड, नूडल्सही मैद्यापासून तयार केलेले असते. यात १०० टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. तंतुमय पदार्थ नाममात्र असतात. याच्या कमतरतेमुळे हृदयरोग, स्थूलपणा असे आजार संभवतात. अपचन, अॅसिडिटीच्या रुग्णांनी मैदा अजिबात खावू नये. रोज दोनपेक्षा अधिक सोडा ड्रिंक प्यायल्याने किडनीला धोका होण्याची शक्यता असते. अधिक प्रमाणात सोडा पिणाऱ्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमही होऊ शकतो. चार आठवडे रोज एक कोला प्यायल्याने ३९२० कॅलरी किंवा १.१ पौंड वजन वाढते. दररोज याच्या ५०० कॅलरी घेतल्या तर आठवड्याला एक पौंड वजन वाढू लागते. रोज खाल्ल्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते. कोलेस्टेरॉलचे प्रमुख कारण ठरणारे सॉलिड फॅट्स ११ टक्के असतात. त्यामुळे रक्तदाब, हृदयरोग होण्याची शक्यता असते. दातही खराब होतात.