आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मक्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, व्हिटॅमिन, लोह असल्याने याचे अनेक फायदे आहेत. त्यातच १०० ग्रॅम मक्याच्या पिठात इतर पालेभाज्या टाकून उपमा बनवल्यास अधिक प्रमाणात पोषण मिळते.
मक्याच्या उपमाचे शरीराला होणारे फायदे
१) मक्याचा उपमा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
२) तुमचे वय कमी दिसते. तुम्ही तरुण दिसायला लागता.
३) मक्यात व्हिटॅमिन ई तसेच विविध अँटीऑक्सिडेंट्स असल्यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात.
४) मक्यात व्हिटॅमिन सी असल्याने केस सिल्की व स्ट्रेट होतात.
५) मक्यात व्हिटॅमिन बी १२, लोह आणि फॉलीक ऍसिड असल्याने महिलांमध्ये सर्वसामान्य असणारी अॅनिमिया ही समस्या दूर होते.
६) कोलेस्ट्रेरॉल कमी होण्यास मदत होते.
७) मक्यात बीटा कॅरेटिन हा गुणधर्म असल्याने ते व्हिटॅमिन ए प्रोड्युस करते जे दृष्टी सुधारण्यास मदत करते.
८) मधूमेहावर उपाय म्हणून मका खाल्लाच पाहिजे. कारण यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते.