आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धार्मिक कार्य, पूजाविधी यामध्ये नारळाला खूप महत्व आहे. शिवाय नारळाचे इतरही अनेक फायदे आहेत. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा एक तुकडा खाल्ल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. याचे इतरही अनेक फायदे असून त्याची सविस्तर माहिती घेवूयात.
हे आहेत फायदे
सनस्क्रीन
नारळाचे तेल उत्कृष्ट सनस्क्रीन असून उन्हात जाण्यापूर्वी नारळाचे तेल लावून बाहेर पडावे. यामुळे महागडे सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही.
मळमळ
मळमळ होत असल्यास नारळाचा एक तुकडा हळूहळू चावून खाल्ल्याने मळमळ बंद होते.
हृदयरोग
नारळामध्ये गुड कोलेज असते यामुळे हृदय निरोगी राहते.
अॅलर्जी
हे एक चांगले अँटीबायोटीक आहे. यामुळे प्रत्येक प्रकारची अॅलर्जी दूर राहते.
पिंपल्स
पिंपल्स दूर करण्यासाठी काकडीच्या रसामध्ये नारळाचे तेल मिक्स करून लावा.
पोट होईल साफ
पचनाची समस्या असल्यास नारळाचा एक तुकडा खाऊन झोपावे. यामुळे सकाळी पोट साफ होते. यातील फायबरमुळे पोट साफ होते.
नाकातून रक्त
नाकातून रक्त येते असल्यास नारळ हे औषधाप्रमाणे आहे. अशा वेळी खोबरे खडीसाखरेसोबत खावे.