आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गाजर (Carrot) हे सलाडमध्ये मोठ्याप्रमाणात खाल्ले जाते. गाजरचा हलावा आणि अन्य काही पदार्थ सुद्धा तयार केले जातात. यामध्ये मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात. गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन के असल्याने रक्त गोठण्यास मदत होऊन रक्तस्त्राव थांबतो. तसेच यातील व्हिटॅमिन सी मुळे जखम लवकर बरी होते. हिरड्यासुद्धा निरोगी राहतात. यातील कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. गाजर (Carrot) अनेक रोगांवर गुणकारी आहे.
हे आहेत फायदे
मधुमेह
यातील पोटॅशियम, मॅगनीज आणि मॅग्निशियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
कॅन्सर
यातील कॅरोटिनाईड तत्त्व प्रोस्टेट, कोलोन आणि स्तन कॅन्सरशी लढा देऊ शकते. याच्या सेवनाने आतडीचा कॅन्सरचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
हृदयरोग
यातील कॅरोटिनॉईड तत्त्वामुळे कोलेस्टेरॉल प्रमाण कमी झाल्याने हृदरोग दूर राहतात.
डोळे
यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळे निरोगी राहतात. तसेच यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियम शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
निरोगी त्वचा
यामुळे चेहरा चमकदार होतो. रक्तातील विषारी घटक कमी झाल्याने मुरूमे-पुटकुळ्या आदींपासून सुटका मिळते.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस