आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ड्राय फ्रूटच्या तुलनेत लोण्यात जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह असते. जास्त दमदार, तरुण दिसण्यासाठी योच दररोज सेवन केले पाहिजे. लोण्यामध्ये अॅँटी – एजिंग आणि अॅँटी – ऑक्सिडेंट गुण असतात जे वाढत्या वयाच्या प्रभावाला कमी करतात. याच्या सेवनाने दिर्घकाळ तारूण्य टिकते. सुरकुत्या पडणे आणि केस पांढरे होण्यापासून लोणी संरक्षण करते.
हे आहेत फायदे
१) यातील फायबर आणि कमी प्रमाणातील फॅटमुळे वजन कमी होते.
२) यातील फायबरमुळे पचनक्रिया सुदृढ राहते.
३) यातील कॅल्शियममुळे कंबर, गुडघे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
४) लोण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात. सोबतच आपल्याला फिटदेखील ठेवते.
५) लोणी हे ह्रदय आणि किडनीसाठीही फायदेशीर आहे. ते किडनीला मजबूत बनविते आणि रक्ताचे पोषण करण्यात मदत करते.