आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भात हा जेवणामधला अविभाज्य हिस्सा असतो. भाताशिवाय भारतीयांचे जेवण पूर्णच होत नाही. पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. जाणून घ्या ब्राउन राइस खाण्याचे फायदे –
वजन कमी करणं –
ब्राउन राइस रोज वाटीभर खाल्ला तर वजन कमी होऊ शकतं.
मधुमेहावर नियंत्रण –
टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांनी आठवड्यातून दोन वेळेस वाटीभर भात खाल्ला, तर त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत.
हाडे मजबूत बनतात
ब्राउन राइसमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत बनतात.
पित्ताशयाचे खडे होण्याचा धोका कमी
ब्राउन राइसमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पित्ताशयाचे खडे होण्याचा धोका कमी होतो.