बीट खाण्याचे ‘हे’ ५ प्रमुख फायदे, जाणून घ्या

July 10, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बीट खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असेल. बीट खाल्याने रक्त शुद्ध होते आणि रक्तात वाढ होते ही गोष्ट सगळयांना माहित आहे. पण या व्यतिरिक्त बीटचे अनेक गुणकारी फायदे आहेत. चला तर जाणून घेऊ बीटचे गुणकारी फायदे:

१. ब्लड शुगर लेव्हल कमी होते :
जर तुम्ही प्रत्येक दिवशी ५०० ग्रॅम बीट खाल्यास ६ तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते. बीटमध्ये असणाऱ्या नायट्रेट्स आणि गॅस नायट्रिक ऑक्साइड्समूळे धमन्या रुंद करण्यास मदत होते. यामुळे ब्लड प्रेशर कमी होते.

२. गर्भवती महीलांना फायदेशीर:
गर्भावस्थेत महिलांना अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. बीटमुळे गर्भवती महिलांना ही अतिरिक्त ऊर्जा मिळते. बीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक ॲसिड असते. जे गर्भवती महिलांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी महत्त्वाचे असते.

३. डायबिटीज वर नियंत्रण :
बीट हे डायबिटीजच्या रुग्णासाठी ही उत्तम औषध म्हणून उपयुक्त आहे. जर डायबिटीज लोकांना गोड पदार्थ खायची इच्छा झाल्यास ते बीट खाऊ शकतात . बीटमुळे त्यांची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि त्यांचा ब्लड शुगरही वाढत नाही. कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स वेजिटेबल असते.

४. सेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते :
बीटला पुराण काळापासूनच जास्त महत्त्व दिले जाते. सेक्स लाईफ मध्येही बीटचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. जुन्या काळात याचा उपयोग यौन स्वास्थ वाढवण्यासाठी केला जात होता. बीट नायट्रिक ऑक्साइड रिलीज करते ज्यामुळे रक्त वाहीन्यांचा विस्तार होतो आणि जेनेटल्समध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. या व्यतिरिक्त बीटमध्ये मोठ्या प्रमाणात बोरॉन केमिकल असते, जे ह्यूमन सेक्स हार्मोनच्या निर्मितीसाठी मदत करते.

५. कॅन्सरसाठी फायदेशीर:
ज्या लोकांना ब्रेस्ट किंवा प्रोस्टेट कॅन्सर आहे त्या लोकांसाठी बीट हे एक उत्तम उपाय आहे. अशा लोकांनी बीट खाल्ले तर त्यांचा ट्युमर वाढण्याची गती १२. ५ टक्केने कमी होते. कारण बीटाचे बेटासायनिन तत्त्व कॅन्सरवर औषध म्हणून काम करते.