आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दुभंगलेले केस हा केसांच्या वाढीतील सर्वात मोठा अडथळा ठरतो. अनेक महिलांमध्ये ही समस्या आढळून येते. केस दुभंगणं म्हणजे केसांना योग्य प्रमाणात पोषण न मिळणे. टाळूच्या त्वचेवरील संरक्षक थर निघून गेल्यामुळे केस निस्तेज बनून टोकाशी दुभंगतात. कोरडी आणि कमजोर केसांमध्ये टोकाशी दुभंगण्याचा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. बऱ्याचदा टोकाशी दोन ते तीन ठिकाणी ते दुभंगतात.
केस दुभंगन्याची कारणे –
टाळूची त्वचा आणि केस कोरडे असणे.
हेअर ड्रायर अतिरीक्त वापर केल्यामुळे
केसांना पुरेसे कण्डिशनर न मिळाल्यामुळे
सतत शॅम्पूने केस धुण्यामुळे, अती गरम पाण्याने सतत केस धूतल्यामुळे
केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी सतत केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे
नियमित ट्रिमिंग न केल्यास.
केसांना वारंवार कलरिंग केल्यास
केस दुभंगून निस्तेज दिसू नयेत यासाठी त्यांच्या पोषणाची काळजी घेतलीच पाहिजे. जाणून घेऊयात दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स –
नियमित केसांचे फाटे कापणे –
नियमित केस कापल्यामुळे किंवा आठवड्यातून एकदा ट्रिमिंग केल्यामुळे केसांचं दुभंगणं कमी होतं.
ऑलिव्ह ऑईल-
ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून लावल्यानं केस मुलायम होतील आणि दुभंगलेले केस कमी होतील.
अंड्याचा मास्क लावा –
अंड्यात थोडं दही घाला त्याचा मास्क केसांना लावा. अंड्याचा मास्क लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात, केसाचं कंडिशनिंग होतं. तसेच दुभंगलेल्या केसांपासून सुटका होते. त्यामुळे केस तुटणार नाहीत. या मास्कमुळे केस अधिक मजबूत आणि मुलायम होतील.
एरंडेल तेल आणि मोहरीचे तेल-
एरंडेल तेल आणि मोहरीचे तेल समान प्रमाणामध्ये एकत्र करा. त्यानंतर केसांना या तेलाने मालिश करा.
दही आणि मध-
दही आणि मध एकत्र करून लावल्यानेही ही समस्या दूर होते. एक कप दह्यामध्ये दोन चमचे मध नीट मिक्स करून केसांवर लावा. मधामुळे केसांवर चमक येईल आणि दुभंगलेल्या केसांपासून सुटका होईल.