आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खाण्यापिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढे पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरेतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत.
ही आहेत सुरूवातीची लक्षणे
१. पाठीच्या खालच्या भागात जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे.
२. गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येते.
३. किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यास असह्य त्रास होतो.
४. कंबर आणि कबंरेखालील भागात जास्त वेदना होतात.
५. पोटात कसेतरी होणे, मळमळणे हे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा उलटीही होते.
६. लघवीचा रंग लालसर येतो, दुर्गंधीही येते.
७. किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. बसायला त्रास होतो. कधी कधी आरामात झोपूही शकत नाही.
८. अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे असाही त्रास होतो. अशावेळी डॉक्टरांकडे जावे.
९. मोठ्या आकाराच्या स्टोनमुळे मूत्रमार्ग ब्लॉक तसरी होतो. यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते.