आरोग्यनामा ऑनलाईन टीम : कान वाहणं हे एक लक्षण आहे जे बऱ्याच विकारांसोबत संबंधित असतं जसे की, कानांचा संसर्ग, कानाची सूज, बाह्य किंवा मध्यवर्ती कानात दुखापत आणि क्वचितच कानाचा कर्करोग. याला ओटोरिया म्हटलं जातं आणि ही स्थिती अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकतं.
काय आहेत याची लक्षणं ?
– कानात वेदना
– कनातून घाण वास येणांर द्रव वाहणं
– तोल न सांभाळता येणं
– चिडचिड
– झोप न येणं
– कान ओढणं
– ताप
काय आहेत याची कारणं ?
– कानाच्या मध्यात संसर्ग (ओटीटीस मीडिया)
– बाह्य कानात संसर्ग (ओटीटीस एक्सटर्ना)
– कानाची सूज
– सर्दी
– टेम्पोरल हाडाला दुखापत
– कानात नववृद्धी (क्वचित आढळलं)
– कानाच्या शस्त्रक्रियेनंतर होणारे परिणाम
काय आहेत यावरील उपचार ?
– वेदना नियंत्रित करण्यासाठी वेदनाशमक
– टॉपिकल स्टेरॉईड
– अँटीबायोटीक इअर ड्रॉप्स
– स्त्राव मेणासारखा असेल र म्युकोलिटीक ड्रॉप्स
– कान स्वच्छ करण्यासाठी अँटीफंगल फॉर्म्युलेशन्स
– ताप नियंत्रित करण्यासाठी अँटीपायरेटीक्स