आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयरोगाचे प्रमाणा जगभरात वाढत असल्याने शास्त्रज्ञांसाठी हे एक आव्हान निर्माण झाला आहे. हृदयरोग नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ सातत्याने विविध प्रयोग करत असतात. असाच एक नवीन शोध शास्त्रज्ञांनी लावला असून सध्या या शोधाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऑस्टनच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांनी अल्ट्रा थिन असा ई-टॅटू तयार केला आहे. हा टॅटू तुमच्या हृदयाची काळजी घेणार आहे. या टॅटूच्या मदतीने हृदयासंबंधीची माहिती स्मार्टफोनवर मिळणार आहे.
हृदयाचे आरोग्याची तपासणीसाठी वापरात असलेल्या मशीनच्या तुलनेत हा टॅटू खूप चांगले काम करणार आहे. यामध्ये लवचिक आणि हलक्या मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. ई-टॅटू खूप हलका आणि लवचिक असल्याने भरपूर कालावधीसाठी तो हृदयावर लावता येईल.सतत हृदयाची तपासणी करावी लागत असल्याने धावपळीमध्ये कधीकधी या तपासणीकडे दुर्लक्ष होते. मात्र, आता असे दुर्लक्ष झाले तरी टॅटू लक्ष ठेवणार आहे. या ई-टॅटूमुळे रुग्णाला हृदयाची माहिती उपलब्ध होणार आहे.
लवचिक आणि पातळ अशा या ई-टॅटूमध्ये असलेल्या दोन सेंसर्समुळे ईसीजी आणि एससीजी दोन्ही एकाच वेळी समजणार आहे. शिवाय एका स्मार्टफोनमध्ये ही माहिती स्टोअर होईल. या ई-टॅटूमध्ये २ थिन असे सेंसर्स लावण्यात असून रुग्णाने श्वास घेतल्यानंतर या ई-टॅटूवर दाब पडतो आणि सेंसर्स काम करतात. ईसीजीमार्फत हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामुळे निर्माण होणारी हृदयाची विद्युतीय सक्रियता तर एससीजीमुळे प्रत्येक हृदयाच्या ठोक्यामुळे छातीवर निर्माण होणारे व्हायब्रेशन समजते. हे दोन्ही सेंसर्स या ई-टॅटूमध्ये आहेत, जे हृदयाची संपूर्ण माहिती स्मार्टफोनवर पाठवतात, असे हे संशोधन करणारे प्राध्यापक नांशू लू यांनी सांगितले.