आरोग्यानामा ऑनलाइन टीम : व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यास डोळ्यांच्या अनेक समस्या होतात. शिवाय यामुळे टीबीतही वाढ होऊ शकते, असे अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या शास्त्रज्ञांना संशोधनात आढळून आले आहे. टीबीचे रूग्ण अथवा टीबीची लक्षणे आढळत असलेल्या व्यक्तींनी अ जीवनसत्त्वयुक्त आहार घेतला पाहिजे.
हे लक्षात ठेवा
अ जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास टीबीत तब्बल १० पटींनी वाढ होऊ शकते.यासाठी आहारात अ जीवनसत्त्वाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे.
१० ते १९ वयातील मुले आणि तरुणांनी हा धोका टाळण्यासाठी आहारावर अधिकच लक्ष केंद्रित करावे. अन्यथा टीबीच्या प्रमाणात वीस पटीपेक्षाही वाढ होऊ शकते.
अ जीवनसत्त्व जसे निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक आहे, तसेच टीबी आणि अ जीवनसत्त्वाचा जवळचा संबंध आहे.
Visit : arogyanama.com