आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना व्हायरस महामारीने सर्वांना स्वच्छतेचे महत्व शिकवले आहे. विशेषकरून जोपर्यंत या धोकादायक आजारावर उपचार किंवा वॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत खबरदारीच सर्वात चांगला बचाव आहे. जेव्हापासून या जीवघेण्या आजाराची सुरूवात झाली आहे, तेव्हापासून सर्व लोकांनी हातांची स्वच्छता(Dry Hands) विशेषकरून सुरू केली आहे. दिवसात अनेकदा हात धुणे आणि सोबतच सतत सॅनिटायझर वापल्याने त्वचा खुपच कोरडी(Dry Hands) होते. अशावेळी हाताचे सौंदर्य राखण्यासाठी आणि ओलावा राखण्यासाठी जास्त काळजी घेतली पाहिजे.
अशी घ्या काळजी
1 केमिकल्सयुक्त हँडवॉश
चांगल्या हँडवॉशची निवड करा. कमीत कमी केमिकल्स वापरलेला हँडवॉश घ्या.
2 हँडक्रीम
हात धुतल्यानंतर हँडक्रिमचा वापर करा.
3 व्हॅसलीन
त्वचा जास्त कोरडी पडली असेल तर व्हॅसलीन वापरा.
4 लिंबू आणि ग्लिसरीन
एका बाटलीत समप्रमाणात ग्लिसरीन, गुलाब जल आणि एका लिंबाचा रस मिसळून ठेवा. रोज झोपण्यापूर्वी हात आणि पायांना लावून मालिश करा.
5 तेल मालिश
खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.