आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Dry Fruits Side Effects In Winter | हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचे सेवन करत असाल तर मर्यादित प्रमाणात करा. कारण जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्यास अनेक समस्या होऊ शकतात. जास्त ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्यास कोण-कोणते साईड इफेक्ट होऊ शकतात ते जाणून घेवूयात. (Dry Fruits Side Effects In Winter)
हे आहेत ते साईड इफेक्ट
1. बद्धकोष्ठता, गॅस आणि डायरिया :
ड्रायफ्रूट्सचे जास्त सेवन केल्यास गॅस, बद्धकोष्ठता किंवा डायरियाची समस्या होऊ शकते.
2. वजन वाढू शकते :
ड्रायफ्रूट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात. यामुळे वजन वाढू शकते. (Dry Fruits Side Effects)
–
3. दातात वेदना :
काही ड्रायफ्रूट्समुळे शरीरात फ्रुक्टोजची मात्रा वाढू लागते. ज्यामुळे दांत किडू लागतात. हिरड्यांना सूज येऊ शकते.
4. शुगर वाढू शकते :
ड्रायफ्रूट्सचे सेवन शुगर वाढवू शकते. यात नॅचरल शुगर असते, परंतु जास्त सेवन केल्यास बॉडीत फ्रुक्टोज जास्त होते आणि शुगरचा स्तर वाढतो.
5. पचनशक्तीवर होतो परिणाम :
पचनशक्ती कमजोर असेल तर ड्रायफ्रूट पचण्यास वेळ लागतो. ड्रायफ्रूट्सचे जास्त सेवन केल्याने पोटात वेदना आणि उलटीची समस्या होऊ शकते. जास्त खाल्ल्यास डोकेदुखी होऊ शकते.
Web Title :- Dry Fruits Side Effects In Winter | dont eat too many dried fruits as they can cause many health problems
Winter Lip Care | हिवाळ्यात ओठ फाटत आहेत का?, मग एक पैसाही खर्च न करता असे बनवा मुलायम!