केवळ प्रोटीन शेकवर अवलंबून राहणे धोकादायक!

protein-drink

आरोग्यनाम ऑनलाईन- बॉडी बनविण्यासाठी अनेक तरूण जिम लावतात आणि प्रोटीन शेक सुरू करतात. प्रोटीन पावडरमध्ये ब्रान्च चने अमिनो अ‍ॅसिड म्हणजेच बीसीएए सप्लिमेंट्स पावडरच्या रूपातही मिळतात, जे पाण्यासोबत मिश्रित करून शेक स्वरूपात घेतले जाते. परंतु, प्रोटीन शेकचा वापर मोठ्याप्रमाणात करणे धोकादायक ठरू शकतो.

एका संशोधनातून हे समोर आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या चाल्र्स पेरकिन्स सेंटरच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. बीसीएएचे अधिक सेवन केल्यास शरीरावर कोणता परिणाम होतो यावर हे संशोधन करण्यात आले. बीसीएएमुळे मसल्स बनवण्यात मदत होत असली तरी संबंधीत व्यक्तीच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. यामुळे वजन वाढू शकते. शिवाय अकाली मृत्यूचाही धोकाही अनेक पटींनी वाढतो.

रक्तात जर बीसीएएचे प्रमाण वाढल्यास झोपेसाठी मदत करणारे हॅप्पी हार्मोन्स सेरोटोनिनचे प्रमाण कमी होते, आणि झोप पूर्ण होऊ शकत नाही. शरीरात अमिनो अ‍ॅसिडचा बॅलन्स आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांमधून प्रोटीन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरात अमिनो अ‍ॅसिडचा बॅलन्स योग्य राहील. केवळ प्रोटीन शेकवर अवलंबून न राहता मांसांहार, अंडी, बीन्स, डाळी आणि नट्सचे सेवन केले पाहिजे.