आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असून याच्या सेवनाने विविध आजारांमध्ये आराम मिळतो. डाळिंबाच्या सालीतील अँटिऑक्सिडेन्टमुळे हा चहा हृदयविकार, कँसर यासारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवतो. पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत राहते. टॉन्सिल्सचा त्रास असल्यास हा चहा जरूर पिऊन बघाच!
असा तयार करा चहा
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी चांगले उकळवा. उकळत्या पाण्यात डाळिंबाच्या सालीचे छोटे-छोटे तुकडे टाकून एक पाणी होईपर्यंत उकळवा. नंतर हे मिश्रण एका कपात गाळून घ्या.
हे आहेत फायदे
१) कँसरपासून बचाव होतो.
२) हृदय रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो हा चहा.
३) पचनसंस्था व्यवस्थित राहते.
४) घसा खवखवणे थांबते.
५) टॉन्सिलचा त्रास कमी होतो.
६) सांधेदुखीवर लाभदायक आहे.