आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संत्रा ज्यूसचे नियमित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध होतो. रोगाच्या साथींपासून बचाव होताच, शिवाय रक्त वाहिन्यांचे रोगांपासून रक्षण होते. पाव लीटर संत्रा ज्यूसमध्ये ११० कॅलरीज असतात. शरीराला आवश्यक एकूण व्हिटामिन सीपैकी ६७ टक्के व्हिटामिन सी संत्र्यातून मिळू शकते. या व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून सर्दी, तापासारख्या त्रासापासून संरक्षण मिळते.
संत्र्याच्या रसामुळे कॅन्सरसारख्या धोक्यांची शक्यता कमी होते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकादेखील कमी होतो. यामध्ये सायटिड्ढक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. संत्र्याच्या रसात झिरो फॅट असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हा रस त्वचेसाठी फायदेशीर असून त्वचेतला तजेला कायम राहतो. त्वचा सतत तजेलदार राहते.