आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गाईचे दूध हे जीवनीय, रसायन, बुद्धिवर्धन, बल्य तसेच स्तन्यवर्धक आहे. निस्तेज, नाजूक, दुर्बल, श्रम, भ्रम, श्वास, कास, अतिक्षुधा व रक्तपित्त यावर गाईचे दूध घेणे खुप लाभदायक आहे. म्हशीचे दूध, गाईच्या दुधापेक्षा अधिक जड व थंड असल्याने ज्यांना खूप भूक लागते व झोप येत नाही अशा लोकांना फायदेशीर आहे. मात्र रोज सकाळी दूध घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्याशिवाय दूध पिऊ नये.
दूध हे मधुर, स्निग्ध, चेहऱ्यावरचे तेज वाढवणारे आहे. दुध हे सप्त धातुंना पोषण करणारे तसेच शुक्रधातूला वाढवणारे जड व शीतल आहे. दुधाने वाताचे व पित्ताचे आजार कमी होतात; पण कफाचे आजार वाढतात. दूध, वात, पित्त, रक्तदोष तसेच डोळ्यांच्या आजारावर, तसेच लहान बालकांना पोषणासाठी अतिशय चांगले आहे. निरोगी राहण्यासाठी सकाळी ८ वाजता १-२ कप दूध, तसेच सायंकाळी ४ वाजता १-२ कप दूध पिणे चांगले असते. पण रात्री दूध शक्यतो घेऊ नये. ज्यांना सर्दी कफ, दमा अंगावर पित्त उठणे, वाढलेले वजन, आळस याचा त्रास आहे. त्यांनी दूध घेऊ नये.
अशा लोकांनी सुंठयुक्त सिद्ध दूध कमी प्रमाणात घ्यावे. योग्य प्रमाणात घेतलेले दूध, हाडांना बळकटी देते. तसेच हाडातील कॅल्शियम योग्य प्रमाणात ठेवते लहान मुलांना दूध देताना, शतावरी, अश्वगंधा विदारिकंद इत्यादी आयुर्वेदिक औषधांचे ग्रॅन्युअल्स किंवा चूर्ण टाकून दूध दिले तर ते शक्तिवर्धक तसेच बुद्धिवर्धक म्हणून काम करते. यामुहे मुले सतत आजारी पडणार नाहीत. मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. दूध अधिक हळद याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर तेज येते. काही प्रमाणात चेहऱ्यावरील वांग सुद्धा कमी होते.