आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ताक एक चांगल्या पेय असून ते शरीरातील विजातीय तत्वांना बाहेर टाकते. उन्हाळ्यात ताक शरीरासाठी खूपच लाभदायक असते. शरिराची रोग प्रतिकारक शक्ती देखील ताकाच्या नियमित सेवनाने वाढते. मात्र, ताकात तुपाचे प्रमाण असू नये. गायीच्या दुधापासूनचे ताक सगळ्यात उपयुक्त मानली जाते. ताकाचे सेवन केल्याने अनेक रोग नष्ट होऊ शकतात.
पोटाचा त्रास असणाऱ्यांनी ताकाचे सेवन नियमित केले पाहिजे.जेवणासोबत ताकाचे सेवन केल्यास पचन होण्यास मदत होते. ताकात जर काळी मिर्ची पावडर, जिरे पावडर आणि थोडे काळे मिठ टाकल्यास अजून चांगली चव येते. गोड लस्सी प्यायल्यास शरिराला नको असलेल्या कॅलरिज जाण्यास मदत होते. ताकाचे सेवन एकतर जेवणा अगोदर करावे अथवा नंतर केल्याने त्याचा फायद लवकर होतो.