आरोग्यनामा ऑनलाइन – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे वडील पुंडलिकराव लहाने यांचे रविवारी दिर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. पुंडलिकराव लहाने यांच्यावर अडीच महिन्यांपासून लातूरच्या गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने रविवारी त्यांचे निधन झाले.
पुंडलिकराव लहाने यांनी आपल्या सर्व मुलांना उच्चशिक्षित केले आहे. डॉ. तात्याराव लहाने हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक असून त्यांचे बंधू डॉ. विठ्ठल लहाने प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन आहेत. पुंडलिक लहाने यांना एकत्र कुटुंबपद्धती फार आवड होती. पुंडलिकराव लहाने यांच्या मागे २ मुलगे, ४ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी रेणापूर तालुक्यातील माकेगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.