आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदर्य वाढविण्यासाठी महिला अनेक उपाय नेहमी करत असतात. यासाठी घरात उपलब्ध विविध पदार्थ वापरले जातात. हे घरगुती उपाय सौंदर्यवाढीसाठी लाभदायक असतात. परंतु, एखाद्यावेळी चुकीचा पदार्थ वापराला गेल्यास त्वचा खराब होऊ शकते. तसेच चेहरा काळाही पडू शकतो. चेहऱ्याला कोणते पदार्थ लावू नये याविषयी आपण महिती घेणार आहोत.
हे पदार्थ लावू नका
व्हिनेगर
व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. त्यामुळे ते थेट चेहऱ्यावर लावू नका. पाणी मिसळून लावा.
व्हिनेगर
व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. त्यामुळे ते थेट चेहऱ्यावर लावू नका. पाणी मिसळून लावा.
बियर
बियर केसांसाठी चांगली असते. काही लोक चेहऱ्यालाही बियर लावतात. यामुळे चेहऱ्याची चमक खराब होते, पिंपल्स येतात.
पुदीना
पुदीना चेहऱ्याला लावल्याने चेहरा लाल होतो. यामुळे सावळेपणा लवकर येतो.
टूथपेस्ट
पिंपल्सवर काही लोक टूथपेस्ट लावतात. पण, यामुळे सुरकुत्या येतात.
व्हॅसलीन
हिवाळ्यात अनेक लोक व्हॅसलीन लावतात. व्हॅसलीन चेहऱ्यावर लावल्याने स्किन पोर्स बंद होतात. यामुळे हे चेहऱ्यावर न लावता पायाच्या भेगांवर लावा.
बेकिंग सोडा
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. परंतु, याचा अतिवापर केल्यास डाग पडतात.