आरोग्यनामा ऑनलाइन टीम – साबणाचा अतिवापर हा शरीरासाठी घातक ठरू शकतो. यामुळे कॅसरसारखा घातक आजार होऊ शकतो, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो औषध विभागाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ट्राइक्लोजन हा घटक साबणात असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. म्हणून साबणाचा अतिवापर करू नये, असे आवाहन देखील या संशोधकांनी केले आहे.
काय आढळले या संशोधनात
१) कर्करोग आणि यकृताच्या रोगाला कारणीभूत असलेला ट्राइक्लोजन घटक साबणात आढळून आला.
२) ट्राइक्लोजनचा उंदरावर प्रयोग केला असता त्याला यकृत बिघाड आणि कर्करोग झाल्याचे दिसून आले.
३) उंदरांवर वाईट परिणाम करणारा ट्राइक्लोजन माणसावरही वाईट परिणाम करू शकतो.
४) ट्राइक्लोजन हा एक रोग प्रतिकारक घटक असला तरी याचा अतिवापर घातक आहे.