आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचे सर्व अवयव स्वच्छ ठेवल्यास आरोग्य चांगले राहते. परंतु, शरीराचे असे अनेक अवयव असतात, ज्यांच्यावर सतत बॅक्टेरिया असू शकतात. तर अवयवय इतके नाजूक असतात की, तेथे बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यास त्रास होऊ शकतो. शरीराच्या काही अंगांना सतत हात लावला गेल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीराच्या कोणत्या अंगांना सतत स्पर्श करून नये ते जाणून घेवूयात.
१. तोंडातील बॅक्टेरिया
दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी तोंडात हात घालू नये. तसेच ओठांना सारखा हात लावू नये. या सवयीमुळे हातांवरील बॅक्टेरिया तोंडात जातात. तोंडातील बॅक्टेरिया बोटांना-हातांना लागतात. बॅक्टेरियांची ही अदलाबदली चेहऱ्यासाठी घातक ठरू शकते. तोंडाची दुर्गंधी, दातांचे दुखणे आणि दातांमध्ये किड अशा समस्या होऊ शकतात.
२. नाकात बोट घालणे
नाकात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. नाकात बोट घातल्याने नाकातील बक्टेरिया बोटांना आणि हातांना लागतात. नाकातील हेच बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसात जातात आणि अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात.
३. नखांमध्ये बॅक्टेरिया
नखांच्या आतल्या बाजूस अनेकप्रकारचे बॅक्टेरिया असतात. नखांमधील बॅक्टेरिया जेवताना पोटात गेल्याने तोंडांचे आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते.
४. बोटांमध्ये बॅक्टेरिया
बोटांमध्ये आणि हातांवर बॅक्टेरिया असतात. असे बोट डोळ्यांना लावल्यास बॅक्टेरियांमुळे डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळ्यांमधून पाणी येणे अशा समस्या होतात.
५. पिंपल्समध्ये बॅक्टेरिया
पिंपल्सला सतत हात लावल्याने यातील वेगवेगळे हानिकारक बॅक्टेरिया चेहऱ्याच्या इतर भागांवर पसरतात. तिथेही पिंपल्स येतात.