आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही विद्यार्थी खुप अभ्यास करतात. परंतु, परीक्षेच्या काळात त्यांना खुप मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम अर्थातच परिक्षेवर होतो. काही विद्यार्त्यांना तर परिक्षेत केलेला अभ्यासच आठवत नाही. सतत तणावामुळे शरीरावरही वाईट परिणाम होतो. परीक्षेदरम्यान तणावमुक्त राहण्यासाठी काय करावे, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
१) विनोदी कार्यक्रम पहा
सतत अभ्यास करण्यापेक्षा मध्ये वेळ काढून विनोदी चित्रपट अथवा कार्यक्रम पहा. हसल्याने तणाव निघून जातो.
२) मोबाईल बंद ठेवा
मोबाईलमुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय येतो आणि नंतर ताण वाढतो. शिवाय, मित्रमैत्रिणींचे येणारे फोन तुम्हाला अधिक मानसिक ताण देणारे असू शकतात. म्हणून परिक्षेच्या काळात फोन बंद ठेवा.
३) ब्रेक आवश्यक
परिखेच्या अभ्यास करताना, ठराविक वेळानंतर मध्येच थांबा. यावेळी काही पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. बदाम, केळी खाऊ शकता. यामुळे मेंदु फ्रेश होतो.
४) थोडावेळ खेळा
खेळल्याने शरीर जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेते. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. खेळण्यासाठी कुणी नसेल तर तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत खेळा.