आरोग्यानामा ऑनलाईन टीम : परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी अनेकजण जिमचा आधार घेतात. परंतु, जिमला जाणाऱ्या सर्वांनाच यश येत नाही. कारण, यश मिळवणारे काही खास नियमांचे पालन करतात. तर काहीजण केवळ घाम गाळतात. जिममध्ये जाऊनही परफेक्ट बॉडी शेप न बनण्याची विविध कारणे असून कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ तज्ज्ञांचा सल्ला
जिम ट्रेनरशी चर्चा करा. त्यांचा योग्य सल्ला घ्या. मनाने काहीही करू नका.
२ योग्य आहार
परफेक्ट बॉडीसाठी जिम एवढाच योग्य आहार महत्वाचा आहे. जिम करून हाय कॅलरीयुक्त जंक फूड आणि शूगरयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यास काहीच फायदा होणार नाही.
३ वर्क आउट
नियोजन करूनच जिममध्ये जा. आठवड्याच नियोजन करा. त्यानुसार व्यायाम करा.
४ गांभिर्य हवे
जिममध्ये आपण गप्पा मारायला जातो की व्यायाम करायला जातो, याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. तेथे जाऊन गप्पागोष्टी करत बसलात तर तुम्ही यशस्वी होणार नाही.
Visit : arogyanama.com