आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजारी असताना कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे डॉक्टर अनेकदा सांगतात. कारण या काळात योग्य आहार न घेतल्यास त्रास वाढू शकतो. काही पदार्थ असे असतात जे आजारपणात खाल्ले असता त्रासदायक ठरू शकतात. यामुळे प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता असते. हे पदार्थ कोणते, याची माहिती घेवूयात.
हे पदार्थ टाळा
अॅसिडीक पदार्थ
अॅसिडयुक्त पदार्थ या काळात खावू नका. यामुळे पोटांचे रोग बळावू शकतात. तसेच अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
गोड पदार्थ
आजारी असताना गोड पदार्थ खाऊ नका. कारण याकाळात हे पदार्थ विषासमान ठरू शकतात. यामुळे आजार वाढू शकतो, तसेच शरीरही कमकुवत होऊ शकते.
अल्कोहोल
अल्कोहोल शरीरासाठी घातक असल्याने ते कधीच सेवन करू नये. परंतु, सवय असल्यास आजारपणात यापासून दूर रहावे. आजारपणात पाचनक्रिया अतिशय कमकुवत शरीराला त्रास होतो.