सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

sugarfree

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सिंथेटिक शुगरफ्री एस्पारटेम, सॅक्रीन आणि शुक्रोजसारख्या रासायनिक तत्त्वांचा अंतर्भाव त्यामध्ये असतो. स्थूलतेने हैराण असलेल्या मधुमेही रुग्णांना शुगरफ्री उत्पादने खाण्याचा सल्ला दिला जातो; पण सिंथेटिक एस्पारटेम साखरेत एस्पारॅटिक व फिनायइलायिन नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. यामुळे वजन वाढू शकते.

शुगरफ्री पदार्थांच्या सेवनाविषयी समज आणि गैरसमज दिसून येतात. शुगरफ्री हा पदार्थ एस्पारटेम, सार्बोटॉल आणि शुक्रालुज या पदार्थांपासून बनवतात. यामध्ये रासायनिक द्रव असतात आणि त्यातून कॅलरीज मिळतातच, असे म्हटले जाते. पण गोड खाण्याऐवजी फळे, सॅलड खाल्ले तर वजन नियंत्रित केले जाऊ शकते.

सिंथेटिक शुगरफ्री एस्पारटेम, सॅक्रीन आणि शुक्रोजसारख्या रासायनिक तत्त्वांचा अंतर्भाव त्यामध्ये असतो. स्थूलतेने हैराण असलेल्या मधुमेही रुग्णांना शुगरफ्री उत्पादने खाण्याचा सल्ला दिला जातो; पण सिंथेटिक एस्पारटेम साखरेत एस्पारॅटिक व फिनायइलायिन नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. तथापि सॅक्रीन, सल्फर डायऑक्साइड क्लोराइन, अमोनिया आणि इतर दोन केमिकल्स अ‍ॅसिडपासून बनवले जाते. त्यामुळे शुगरफ्री उत्पादनांच्या वापरामुळे रक्तात कोलेस्टेरॉलची वाढ वेगाने होते त्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येत भर पडू शकते.