आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही चुकीच्या सवयींमुळेच आपले आरोग्य धोक्यात येत असते. अशा सवयींपासून दूर राहिल्यास तुमचे आरोग्यसुद्धा चांगले राहू शकते. आरोग्यासाठी सर्वात घातक आहे ती कोल्ड्रिंक पिण्याची सवय. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. म्हणूनच ही सवय वेळीच सोडून दिली पाहिजे.
होतात हे दुष्परिणाम
१) यकृतावर परिणाम
यातील फ्रक्टोज लवकर फॅटमध्ये रुपांतरीत होत असल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो.
२) अल्सर
याच्या अॅसिटीक क्विलिटीमुळे अॅसिडीटी वाढते. अल्सरचा त्राससुद्धा होऊ शकतो.
३) व्यसन
यात साखर जास्त असल्याने मेंदूमध्ये डोपामिन नावाचे केमिकल तयार होते. यामुळे या पेयांचे व्यसन लागते
४) लठ्ठपणा
याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. शुगर, फ्रक्टोजस कॅलरी वाढवणारे घटक यात असतात.
५) मधुमेह
यातील कॅलरीजमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
६) कमजोर हाडे
या सवयीमुळे हाडे ठिसूळ होतात. यातील फॉस्फिरिक अॅसिड कॅल्शिअमचे शोषण थांबवते.