आरोग्यानामा ऑनलाईन टीम : ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने ते शरीराला कोणत्याही प्रकारच्या कँसरशी अधिक सक्षमतेने लढण्यासाठी तयार करतात. या अॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे शरीरात फ्री रॅडीकल्सचा प्रभाव कमी होतो. ग्रीन टी पिण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे असून ते जाणून घेवूयात.
१ रोगप्रतिकारशक्ती
यातील अॅन्टीबॅक्टेरिअल घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताप, अंगदुखी दूर होते.
२ चांगली झोप
याच्या नियमित सेवनाने चांगली झोप येते. थकवा कमी होतो.
३ लठ्ठपणा
यातील एपिगॅलोकॅटोकिनमुळे मेटॅबॉलिझम वाढते. तसेच शरीरात उष्णता निर्माण होते. दिवसभर फ्रेश वाटते. भूकेवर नियंत्रण राहते. फॅट बर्न होते.
४ कोलेस्टेरॉलचे नियंत्रण
कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, हृदयाचे कार्य सुरळीत चालते.
हे लक्षात ठेवा
अतिप्रमाणात तिचे सेवन करू नका. ग्रीन टीचे काही दुष्परिणामदेखील आहेत.
Visit : arogyanama.com