आरोग्यनामा ऑनलाईन टीम – श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. श्वासदेखील अनेक आजारांचे संकेत देतो. श्वास घेण्याच्या त्रासावरून कँसर, शुगर, फुप्फुस आणि ह्रदयाच्या आजाराचे संकेत मिळतात.
हे आहेत संकेत
किडनी फेल
श्वास घेण्यात अडचणी येत असेल तर हा किडनीच्या आजाराचा संकेत असू शकतो. यामुळे रक्तातील युरियाची पातळी वाढते. यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. तोंडाची चवही खराब होते.
शारीरीक हालचाली
लठ्ठ व्यक्तींना चरबीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच श्वासामध्ये हायड्रोजन गॅस आणि मिथेनचे प्रमाण वाढल्यानेही श्वास घेण्यात अडचणी येतात. अशा व्यक्तींनी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
पोटाचा कँसर
पोटाच्या कँसरमुळेही श्वास घेण्यात अडचणी येतात.
पल्नोमरी हायपरटेंशन
अचानक श्वासांची गती वाढणे, चक्कर किंवा थकवा येणे, हे पल्नोमरी हायपरटेंशनचे संकेत आहेत. यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे ह्रदयाचेही आजार होऊ शकतात.