आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केवळ तज्ज्ञांनी सांगितलेले घरगुती उपायच केले पाहिजेत. कारण, चुकीचे पदार्थ वापरून घरगुती उपाय केल्यास केसांचे नुकसान होऊ शकते. निरोगी केसांसाठी काही पदार्थ नेहमी टाळले पाहिजेत. हे पदार्थ चुकूनही केसांना लावू नयेत. हे पदार्थ कोणते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे पदार्थ टाळा
१) व्हिनेगर
केसांचा कोरडेपणा वाढतो. केस गळू लागतात.
२) बटाटा रस
यातील ब्लिचमुळे केस पांढरे होतात. टक्कल वाढते.
३) बेसन
हे लावल्याने टक्कल वाढते. केसात कोंडा होऊ शकतो.
४) बियर
हे डायल्युट न करता केसांना लावल्याने केस जास्त गळतात. टक्कल वाढते.
५) बेकिंग सोडा
हा डायल्युट न केल्यास केसांची चमक कमी होते. टक्कल वाढते.