आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सोलापुरातील एका कुटुंबावर एक मोठा प्रसंग ओढावला. एका अपघातात वडीलांचा जागीच मृत्यू तर १९ वर्षांचा मुलगा गंभीर झाला. या अपघातानंतर गंभीर जखमी आवस्थेत मुलाला यशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या मुलाच्या आईला या घटनेने खूप मोठा धक्का बसला होतो.
कारण अपघातात तिने आधीच पती गमावला होता. त्यापाठोपाठ मुलगाही गमावला होता. अशाही परिस्थितीत तिने मन घट्ट करून मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ५ जणांना जीवदान मिळाले आहे.वडील आणि मुलगा बाईकवरून जात असताना त्यांच्या बाईकला मोठा अपघात झाला. ९ जूनला ही घटना घडली. वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मुलास ब्रेनडेड घोषित केले. यानंतर त्याच्या आईचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले आणि तिने अवयवदानासाठी परवानगी दिली.अवयवांच्या रूपाने आपल्या मुलाचे अस्तित्व रहावे यासाठी त्यांनी अवयवदान करायला परवानगी दिली. त्यानुसार मुलाचे फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. फुफ्फुस मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आले. तर यकृत पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात, स्वादुपिंड आणि एक किडनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देण्यात आली. तर दुसरी किडनी योशधन रुग्णालयातील गरजूला दान करण्यात आली.