आरोग्यनामा ऑनलाईन टीम – असे अनेक लोक आहेत की त्यांना दातांच्या अनेक समस्या असतात. पण त्यावर नेमका काय उपाय करावा हे आपल्याला समजतच नाही. दातांच्या दु:खण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे, मधुमेहामुळे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात. पण काही घरगुती उपायांनी आपण दातांच्या अनेक समस्या नियंत्रणात आणू शकतो.
१) लवंग हि दातांच्या कोणत्याही समस्येसाठी फायदेशीर आहे. लवंगामध्ये औषधी गुण असतात. ज्यामुळे जंतू आणि इतर जीवाणू नष्ट होतात. लवंग दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. त्यामुळे दाताचे दुखणे कमी होते. परंतु दुखण कमी होण्यासाठी वेळ लागतो.
२) हिंगही दातांच्या दुखण्यावर चांगला उपाय आहे. हिंग हे साधारणत: सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं. उपचारासाठी चिमुटभर हिंग घ्या. त्याला मोसंबीच्या रसात मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवा आणि भिजलेला कापूस दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. याने आपल्या दातांचं दुखणे कमी होईल. हा घरगुती उपाय खूप सोपा आणि प्रभावी आहे.
३) लसूणही दाताच्या दुखण्यासाठी आरामदायी आहे. कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दाताजवळ पकडू शकता. यामुळे दाताला आराम मिळतो.
४) जर तुम्हाला दातांचे दुखणे असेल तर कांद्याचे तुकडे दाताजवळ धरा किंवा कांदा चावून खा. असं केल्याने काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल.