आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कमी वयात जास्त वजन उचलल्याने उंचीची वाढ खुंटते, असा एक गैरसमज अनेकांमध्ये दिसून येतो. निव्वळ या कारणामुळे अनेक तरूण मुले जिममध्ये जात नाहीत. परंतु, यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. प्रत्येकाला आपली उंची जास्तीतजास्त असावी असे वाटते. मात्र, अनेकदा उंची लवकरच खुंटते. कमी उंचीमुळे व्यक्तीमत्वसुद्धा चांगले दिसत नाहीत. उंचीबाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
अशी वाढवा उंची
१ शरीराच्या विकासात न्यूटिड्ढएंटची भूमिका महत्वाची असते. नेहमी व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अँटी-ऑक्सिडेंटने भरपूर पदार्थ खावेत.
२ शरीराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी सतत पाणी प्या.
३ फिजिकली अॅक्टिव रहा. स्वीमिंग, रनिंग, हॅगिंग, टो-टच, सुपर स्टड्ढेच, स्किपिंग करा.
४ नियमित पुरेशी झोप घ्या.
हे लक्षात ठेवा
तरूणपणात टेस्टोस्टेरॉनसह आणि इतरही शरीराच्या विकासात मदत करणारे हार्मोन्स रिलीज होतात. यापैकीच ऑस्टियोसाइट सेल्स म्हणजेच हाडांचे टिश्यू तयार करणारे सेल्स वाढल्याने हाडांची लांबी वाढते. त्याचाच परिणाम म्हणजे उंची वाढते. उंची वाढण्यासाठी कधीही औषधांचा वापर करू नका. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Visit : arogyanama.com