आरोग्यनामा ऑनलाइन- थॅलेसिमिया हा रक्ताशी संबंधीत आजार आहे. अशा व्यक्तींना शासनाकडून अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमन २०१६ अंतर्गत लाभ मिळतो. अनेक रूग्णांना याबाबत माहिती नसते. यासाठी पुण्यात काही डॉक्टरांनी पुढाकार घेतला असून या शासकीय लाभांबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे.
या रूग्णांना दररोजच्या आयुष्यात खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. सरकारने या रूग्णांसाठी २०१८ साली सप्टेंबरमध्ये यासंदर्भातील जीआर काढला. पुण्यातील काही डॉक्टरांनी यासंदर्भातील जनजागृतीसाठी तीन कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे.
कार्यशाळेत थॅलेसिमियाबाबत जनजागृती तसेच सरकारचा जीआर रूग्णांना समजावून सांगितला गेला. कार्यशाळेमुळे अनेक रूग्ण सर्टिफिकेटसाठी नोंदणी करण्यास देखील पुढाकार घेतात.