आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Blood Pressure | आहारात बीटचा नियमित समावेश केल्यास थोड्याच दिवसात याचे चांगले परिणाम आरोग्यावर दिसून येतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने विविध आजार दूर होऊ शकतात. तसेच शरीर सुदृढ होते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलिक अॅसिड तसेच विटॅमिन सी असते. याचा वापर सलादमध्ये करता येतो. यातील नायट्रटमुळे रक्तदाब कमी होतो. (High Blood Pressure)
या आजारांवर गुणकारी
१) मासिक पाळी
महिलांना मासिक पाळीचा त्रास असल्यास कच्चे बीट जास्त प्रमाणात खावे. यामुळे दूध आणि रक्तही वाढते.
२) यकृत रोग
यकृत रोग व पित्ताशय संबंधी आजारात बीटच्या रसासोबत समभाग गाजर व काकडीचा रस मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ प्या.
३) केसगळती
बीटच्या १०० गॅम रसात २५ ग्रॅम सिरका मिसळून केसांच्या मुळांना लावल्यास कोंडा जातो. केसगळती थांबते.
४) लठ्ठपणा
बीटच्या रसासोबत गाजरचा रस समभाग मिसळून पिल्याने ताकद वाढते. चरबी कमी होते.
५) कानदुखी
पानांसोबत बीट सेवन केल्यास लवकर पचते. बीटच्या पानांचा रस कोमट करुन कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते.
६) गजकर्ण
बीटच्या पानांचा रस मधात मिसळून गजकर्णच्या ठिकाणी लावल्यास लवकर बरे होते.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस