आरोग्यनामा ऑनलाईन- मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची दिनचर्या ठरवून दिलेली असते. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील तितकीच महत्वाची आहे. अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पोटावर झोपल्याने अनेक समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजच बदलून टाका.
सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम
पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखी, मानदुखी, आणि पाठदुखीची वेदना सुरु होतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो.
मानेमध्ये अन् डोक्यात वेदना
पोटावर झोपल्यामुळे मानदुखी होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही. तसेच डोकेदुखी होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण योग्यरित्या होत नसल्याने डोकेदुखी सुरु होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.