आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मनुष्य शरीराबाबत अनेक आश्चर्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिंकताना डोळे बंद होणे. शिंकणे तशी सामान्य गोष्ट असली तरी शिंक येण्यामागे विविध कारणे असतात. अनेकदा अॅलर्जीमुळेही शिंक येतात. शिंकताना आपले डोळे का बंद होतात? याबाबत अनेक गैरसमज आहेत. असेही म्हटले जाते की शिंकताना डोळे बंद नाही केले तर डोळे बाहेर येऊ शकतात. परंतु, याचे खरे कारण आपण जाणून घेवूयात.
१ शिंक का येते
श्वसनात अडथळा निर्माण करणारे घटक श्वसननलिकेत अडकल्यास मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतूना संदेश पाठवतात. यावेळी आपली फुफ्फुसे जास्त प्रमाणात ऑक्सिजन साठवतात आणि ते घटक शिंकेमार्फत बाहेर फेकले जातात. यास शिंक म्हणातात.
२ डोळे बंद होण्याचे कारण
शिंका येण्याआधी शरीर स्वतः त्या प्रक्रियेसाठी तयार होते. यादरम्यान छातीचे स्नायू घट्ट होतात. शिंका येण्यासाठी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतू जबाबदार असतात. त्यांचे नियंत्रण डोळे, नाक, तोंड आणि जबड्यावर असते. यामुळेच शिंका आल्यावर या सर्व अवयवांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. त्यामुळे शिंकताना डोळे बंद होतात. तसेच हवेतील विषाणूंपासून रक्षण करण्यासाठी डोळे बंद होतात, असेही सांगितले जाते.
Visit : arogyanama.com