आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लसूण आरोग्यासाठी लाभदायक असून रोज एक लसणाची पाकळी खाल्ल्याने अनेक आाजार दूर राहतात. यामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषकतत्त्व असतात. विशेष म्हणजे लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाही. यामुळे त्वचाही नितळ होते. लसणाचे अन्य कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत आरोग्यदायी फायदे
१ लसणामुळे उच्च रक्तदाब कमी होतो.
२ हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
३ हृदयाचे ऑक्सिजन रॅडीकल्सपासून रक्षण होते.
४ रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
५ तारुण्यपिटीकांची समस्या दूर होते.
६ लसणामुळे त्वचेचे आजार बरे होतात
७ तळपायाच्या रिंगवर्म किंवा अॅथलिट फुटसारख्या आजारांवर गुणकारी.
८ रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.
९ टिबीच्या आजारात गुणकारी आहे.
१० अॅसिडीटी आणि डायरियावर उत्तम उपाय आहे.
Visit : arogyanama.com