आरोग्यानामा ऑनलाइन टीम – भूमध्य सागरी आहारात फळं, भाज्या, ऑलिव्ह तेल, गहू, तांदूळ, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मद्य, लाल मांस व कोंबडी जन्य उत्पादनं मर्यादित प्रमाणात असतात. वय वाढतं, तसा मेंदूचा आकार कमी होतो. मेंदूच्या पेशी मरतात व त्याचा आकलन व स्मृतीवर परिणाम होतो, असं स्कॉटलंडच्या एडिंग्टन विद्यापीठाच्या मिशेल ल्युसियानो यांनी म्हटलं आहे. भूमध्य सागरी आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, असा असा दावा या संशोधकांनी केला आहे.
संशोधकांनी स्कॉटलंडमधील ९६७ वयोवृद्ध म्हणजे सत्तर वर्षांवरील व्यक्तींच्या आहार सवयींचा अभ्यास केला. त्यांना विस्मरणाची व्याधी नव्हती. ५६२ जणांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन केलं असता भूमध्य सागरी आहार घेणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील करडा भाग व कॉर्टेक्सची जाडी वाढलेली होती. वृद्ध लोकांसाठी या आहाराचा पाठपुरावा केला असता त्यांच्यात मेंदूची हानी तीन वर्षांच्या काळात कमी दिसून आली, तर ज्यांनी हा आहार घेतला नाही, त्यांच्यात ती जास्त दिसून आली. आधीच्या अभ्यासापेक्षा वेगळे मत व्यक्त करताना वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, मासे जास्त खाणं व मांस कमी खाणं, यांचा संबंध मेंदूशी असत नाही.
आहाराबरोबरच झोपदेखील महत्वाची
आहाराबरोबरच झोपदेखील तेवढीच महत्वाची असते. झापे कशी आणि किती घ्यावी. रात्री कधी झोपावे आणि सकाळी किती वाजता उठावे, याविषयी काही तज्ज्ञ सांगतात की, अनेकांना सकाळी उठण्यास फार त्रास होतो. अनेकदा आपले रोजचे वेळापत्रक बिघडल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी हे आहेत काही उपाय, ज्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत होईल. अपूर्ण झोपेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे रात्री वेळेवर झोपा. यामुळे तुमची झोप पूर्ण होऊन तुम्ही सकाळी जागे होऊ शकाल. आठवड्याचे योग्य वेळापत्रक बनवा. सुट्टीच्या दिवसांचं वेगळं वेळापत्रक बनवा. शरीरासाठी ७ ते ८ तास झोप गरजेची असते. त्यामुळे तितकी झोप घेण्याला प्राधान्य द्या. सकाळी जाग आल्यानंतर लगेचच बेडवरून उठा. बेडवर लोळत राहिल्यास आळस येतो. सकाळी काही व्यायाम करा.