आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डाळ-भात हे आपल्याकडे नेहमीच्या आहारातील दोन पदार्थ आहेत. लहान मुलांना डाळ-भात आवर्जून दिला जातो. डाळ-भात हा अतिशय सकस आणि पौष्टिक आहार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण, यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि इतर लाभदायक घटक असतात. डाळ-भात खाल्ल्याने कोणते फायदे होतात. ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ वजन कमी होते
वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा भात खायला हवा. तसेच भाज्याही खाव्यात.
२ सोपी कृती
डाळ-भात तयार करण्याची तसेच खाण्याची पद्धत अतिशय सोपी असल्याने ते कुणीही तयार करू शकते.
३ हलका आहार
यामुळे पचनक्रियेला आराम मिळतो. मसूर डाळ, मूग डाळ पचायला हलकी असते. भातही पचनाला हलका असतो. यातील कार्बोहाइड्रेटमुळे शरीराला उर्जा मिळते.
४ भरपूर प्रोटीन
शाकाहारींसाठी डाळ हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे. डाळ आणि भातात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे एकत्र खाल्ल्याने प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात.
५ फायबर
यातील फायबरमुळे पचनतंत्र नियंत्रित आणि सुरळीत राहते. तसेच मधुमेहासारखा रोगांपासून सुटका मिळू शकते. रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Visit : arogyanama.com