आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे. फिटनेससाठी अनेकजण नियमित ग्रीन टी पितात. मात्र, ग्रीन टीच्या बॅग्ज वापरल्यानंतर त्या टाकून दिल्या जातात. त्या टाकून न देता त्यांचा पुनर्वापर दुर्गंधी घालविण्यासाठी करता येतो. टीबॅग्जचे दुर्गंधी घालवण्यासाठी कोणते उपाय आहेत हे जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१. शूजमधून दुर्गंधी येत असल्यास अशा वेळी टी बॅगचा वापर करता येतो. यासाठी वापरलेली टी बॅग धुवून सुकवून रात्रभर शूजमध्ये ठेवा. टी बॅग दुर्गंधी आणि शूजमधला ओलावा शोषून घेते.
२. जिम बॅगची दुर्गंधी घालवण्यासाठी टी बॅगचा वापर करता येतो. या बॅगमध्ये टी बॅग ठेवा. लवकरच दुर्गंधी कमी होईल.
३. फ्रिज उघडल्यावर खराब वास येत असल्यास वापरलेल्या टी बॅग फ्रिजमध्ये ठेवा. दुर्गंधी दूर होते.