आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उच्च रक्तदाबाप्रमाणेच कमी रक्तदाब हा सुद्धा गंभीर आजार समजला जातो. रक्तदाब ९० ते ६० किंवा यापेक्षा कमी असल्यास कमी रक्तदाब असतो. कमी रक्तदाबामुळे मेंदूला आणि शरीरातील इतर अवयवांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. यामुळे चक्कर येण्यासारख्या समस्या जाणवतात.
ही आहेत मुख्य कारणे
१) भरपूर घाम आल्याने किंवा जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होणे.
२) उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांवर घेतली जाणारी औषधे.
३) गंभीर स्वरूपाचा जंतूसंसर्ग.
४) हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे.
५) गरोदरपणा
करा हे उपाय
* ३० बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी ते चावून खा. बेदाणे भिजवलेले पाणीही प्या.
* ८ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदाम सोलून वाटून एक ग्लास दुधात घालून दूध गरम करा. नंतर हे दूध प्या.
* तुळशीच्या १० ते १५ पानांचे तुकडे करून एका कपड्यात बांधून ठेवा. सकाळी उठल्यावर ही पाने एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा.