आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सततची धावपळ, स्पर्धा, ध्येयप्राप्तीसाठी चाललेली रस्सीखेच, यश-अपयश, चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आदी कारणांमुळे मानसिक ताणावाची समस्या त्रासदायक ठरते. हा मानसिक ताण वेळीच दूर केला नाही, त्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी कोणते उपाय, करावेत याची आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
१ संवाद साधा
मित्र, मैत्रिणींशी नेहमी सुसंवाद साधा. यामुळे तणावातून मुक्त होण्यास मदत होते.
२ व्यायाम करा
नियमित व्यायाम केल्याने शरीरासह मानसिक लाभही होतात. यासाठी सकाळी लवकर उठून व्यायाम करा, योगासने करा.
३ छंद जोपासा
लिखाण, चित्रकला, संगीत आदी छंद जोपासल्याने मानसिक ताण कमी होतो.
४ फिरायला जा
मानसिक ताण जाणवत असल्यास चार दिवस सुट्टी काढून कुटुंबासह कुठेतरी फिरायला जा.
Visit : arogyanama.com