‘दाट’ आणि ‘काळेकुट्ट’ केसांसाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या

August 4, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेले राहणीमान , प्रदूषण , ताण -तणाव यांसारख्या कारणांमुळे  केसांच्या समस्या वाढीस लागल्या आहेत. आपले केस दाट, मुलायम  असावेत असे प्रत्येकाला वाटते. जास्त केस गळणे, अकाली पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. केसांच्या या समस्येवर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास केस गळण्याची समस्या आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.  मुलायम , दाट आणि काळेभोर केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काही आयुर्वेदिक पदार्थ मिक्स करून केसांना लावा.

दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी उपाय –

साहित्य – हर्बल मेहंदी , आवळा पावडर , भृंगराज चूर्ण , शिकेकाई पावडर 

कृती 

लोखंडी कढईमध्ये दीड ग्लास पाणी घ्या आणि  मध्यम आचेवर गरम करा. त्यानंतर दोन मिनिटे  पूर्ण आचेवर गरम करा व ते पाणी थंड होण्यासाठी ठेवा. या पाण्यात दोन चमचे उत्तम प्रतीची आवळा पावडर टाका.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात दोन चमचे हर्बल मेहंदी टाका व मिक्स करा.

त्यांनतर या मिश्रणात दोन चमचे भृंगराज चूर्ण व एक चमचा  शिकेकाईची पावडर टाका.
(बाजारात मिळणारी शिकेकाईची पावडर न वापरता  शिकेकाईच्या शेंगा बारीक कुटून त्याची पावडर बनवा.)

वरील सर्व मिश्रण रात्रभर भिजत ठेवा.
(तुमच्याकडे जर वेळेची कमी असेल तर हे मिश्रण १ तास भिजल्यानंतरही तुम्ही केसांना लावू शकता. मात्र त्याचे अधिक परिणाम जाणवणार नाहीत. )

रात्रभर भिजत ठेवलेले मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. त्यांनतर १ ते २ तासांनी केस साध्या पाण्याने धुवा. मेहंदी लावलेले केस धुण्यासाठी कधीही शाम्पूचा वापर करू नये.

तुमचे केस जर गळत असतील , अकाली पांढरे होत असतील किंवा रुक्ष होत असतील तर हा  उपाय करा आणि काळेभोर आणि दाट केस मिळवा.