आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी जाग आली की अनेकजण पटकन उठून उभे राहतात. काही जण घाईगडबडीत उठून कामाला लागतात. परंतु, ही सकाळी उठण्याची पद्धत योग्य नसून शरीरासाठी त्रासदायक आहे. यामुळे हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सकाळी उठण्याची योग्य पध्दत सांगितली असून त्यानुसार उठल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.
सकाळी उठण्याची योग्य पध्दत
१ सकाळी झोपेतून जाग आल्यानंतर प्रथम उजव्या बाजूला झुका. नंतर उठून बसा.
* असे केल्याने हृदयावर एकदम दबाव पडत नाही.
२ आता दोन्ही हात वर करून स्ट्रेचिंग करा.
* शरीरात रात्री रक्तपुरवठा मंद असतो, असे केल्याने तो सामान्य होतो.
३ आता तळहात एकमेकांवर घासा आणि डोळ्यांवर ठेवा.
* यामुळे शरीराची सजगता वाढेल.
४ आता दोन्ही हातांचे चुंबन घेवून अंथरूण सोडा.
* दोन्ही हातांचे चुंबन घेतल्याने शरीराची उर्जा पातळी वाढते.